आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamta Kulkarni Became A Sadhvi And Now Caught In Drug Trafficking

बोल्ड अभिनेत्री होती ममता, नंतर झाली साध्वी...आणि आता ड्रग तस्करीत झाली अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी)
मुंबई: माजी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला पती विक्की गोस्वामीसह केन्यामध्ये ड्रग तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ममता 90च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री होती. तिने शाहरुख खान, सलमान खान. सैफ अली खान, गोविंदा आणि अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारसोबत काम केले आहे.
ममता आपल्या बोल्ड इमेजमुळे एकेकाळी तरुण वर्गात चांगलीच लोकप्रिय होती. तिने वयाच्या 19व्या वर्षी सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली. तिने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 1992मध्ये 'तिरंगा' सिनेमातून पाऊल ठेवले. या सिनेमातून तिने प्रेक्षकांवर जादू केली आणि तिला अनेक बॉलिवूड सिनेमांच्या ऑफर मिळायला लागल्या.
ममताने त्याकाळी बोल्ड सीन्ससुध्दा दिले. तिला बोल्ड सीन्स देण्यात कधीच कमीपणा वाटला नाही. 2002मध्ये ममताने सिनेमांमधून ब्रेक घेतला आणि अचानक लाइमलाइटमधून गायब झाली. फिल्म इंडस्ट्रीमधून सन्यास घेतल्यानंतर आता ममता ड्रग तस्करी करणा-या विक्की गोस्वामीसोबत दिसली. 1997मध्ये विक्कीला दुबईमध्ये 11.5 टन मँड्रेक्स ड्रग्सच्या तस्करीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर विक्की तुरुंगातून बाहेर पडताच ममताने त्याच्यासोबत लग्न केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ममताच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी...