आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादमध्ये लहानाचा मोठा झाला ममता कुलकर्णीचा पती विकी, याच बंगल्यात गेले बालपण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः अहमदाबादच्या पालडी परिसरस्थित लक्ष्मीकूंज सोसायटीतील गोस्वामींचा बंगला आणि इनसेटमध्ये विकी गोस्वामी-ममता कुलकर्णी)
अहमदाबादः ब-याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी चर्चेत आली आहे. मीडियात आलेल्या वृत्तानुसार, केनिया पोलिसांनी ममता कुलकर्णीला तिचा पती विकी गोस्वामीसह अंमली पदार्थांच्या तस्करी केल्याच्या आरोपात अटक केली आहे. मात्र आता या प्रकरणाला एक नवीन वळण आले आहे. अटकेत असलेल्या महिलेने चौकशी अधिका-यांना सांगितले, की ती ममता कुलकर्णी नसून तिच्यासारखी दिसणारी केनिया वंशाची इव्हेंट मॅनेजर आहे. या महिलेने स्वतःचे नाव आएशा बेगम असे सांगितले आहे. चौकशी अधिका-यांनी मात्र महिलेने नोंदवलेल्या जबाबावर शंका व्यक्त केली आहे. अधिका-यांनी विकी आणि त्याच्या पत्नीची ओळख पटवण्यासाठी भारतीय पोलिसांना अलर्ट पाठवले आहे.
याप्रकरणात यापूर्वीही विकीचे नाव समोर आले होते. 1997 मध्ये विकी गोस्वामीला 60 लाख डॉलरच्या ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याला दुबईत ही अटक झाली होती. विकी गोस्वामीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र दुबईतील तुरुंगातच विकीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे पाच वर्षांतच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातच त्याने ममतासोबत लग्न केले. लग्नानंतर ममता केनियात स्थायिक झाली.
उल्लेखनीय म्हणजे तस्कर विजय आनंदगिरी गोस्वामी उर्फ विकी गोस्वामीचा बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचा काळ अहमदाबादमध्ये गेला आहे. अहमदाबाद येथील पालडी परिसरस्थित लक्ष्मीकूंज सोसायटीतील बंगला नं. 6 हा विकी गोस्वामीच्या घराचा पत्ता आहे. आजही येथे विकीचे कुटंबीय वास्तव्याला आहेत. मात्र या कुटुंबाने आता विकीसोबतची सर्व नाती संपुष्टात आणली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या विकी गोस्वामीविषयी बरेच काही..