(मॉडेल आणि अभिनेत्री मनस्वी ममगई)
मुंबईः अभिनेता
अजय देवगण सध्या
आपल्या आगामी 'अॅक्शन जॅक्सन' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 'अॅक्शन जॅक्सन' या सिनेमात अजयसोबत सोनाक्षी सिन्हा, यामी गौतम,
सोनू सूद, कुणाल रॉय कपूर आणि मनस्वी ममगई हे कलाकार झळकणार आहेत. बुधवारी अजय आणि मनस्वीने सिनेमाचे काही सीन्स एकत्र शूट केले.
'अॅक्शन जॅक्सन'शी निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी या सिनेमातील आयटम नंबर शूट करण्यात आला. मनस्वी या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ऑन लोकेशन शूटिंगवेळी मनस्वी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. पिंक कलरचा शॉर्ट ड्रेस तिने परिधान केला होता. शिवाय पाठीवर एक टॅटूसुद्धा दिसला. तर दुसरीकडे अजय ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. ब्लॅक जीन्स, टीशर्टमध्ये तो कूल दिसत होता. 'अॅक्शन जॅक्सन' हा सिनेमा प्रभूदेवा दिग्दर्शित करत आहेत.
कोण आहे मनस्वी ममगई?
मुळची दिल्लीची असलेल्या मनस्वीने 2010मध्ये मिस इंडिया वर्ल्डचा खिताब आपल्या नावी केला होता. याशिवाय ती 2008 मध्ये मिस टुरिज्म इंटरनॅशनलसुद्धा ठरली होती. मॉडेल म्हणून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही जाहिरातींमध्ये ती झळकली आहे.
शाहरुख खान हा तिचा आवडता अभिनेता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'अॅक्शन जॅक्सन'च्या ऑन लोकेशन शूटिंगची मनस्वी ममगईची छायाचित्रे...