आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mandakini Phalke : First Female Artist Of Bollywood

ही आहे भारतीय सिनेसृष्टीतील पहिली बालकलाकार, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कालिया मर्दन'च्या एका दृश्यात मंदाकिनी फाळके)
मुंबई - टीव्ही आणि सिल्व्हर स्क्रिनवर आपण श्रीकृष्णाच्या लीलांचे चित्रण नेहमीच बघत
असतो. अभिनेत्यांसह काही अभिनेत्रींनीसुद्धा पडद्यावर कृष्णाची भूमिका साकारली आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी फाळके. मंदाकिनी यांना भारतीय सिनेमा जगतातील पहिली महिला बालकलाकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी दोन पौराणिक सिनेमांमध्ये कृष्णाची भूमिका साकारली होती.
मंदाकिनी सर्वप्रथम 1918 मध्ये धोंडिराज गोविंद फाळके (दादासाहेब फाळके) दिग्दर्शित 'श्री कृष्ण जन्म' या सिनेमात बाळकृष्णाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्यानंतर 1919 मध्ये 'कालिया मर्दन' या सिनेमात त्यांनी पुन्हा एकदा कृष्णाचे रुप साकारले होते. हा सिनेमासुद्धा दादासाहेब फाळके यांनीच दिग्दर्शित केला होता. मंदाकिनी भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या थोरल्या कन्या होत्या. भारतातली पहिली बाल कलाकार फाळके यांनी आपल्या घरातून पडद्यावर आणली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा मंदाकिनी फाळके यांची 'कालिया मर्दन'मधील कृष्ण रुपाची एक झलक...