आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद इब्राहिमसोबत नव्हे तर आता यांच्यासोबत राहते मंदाकिनी, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐंशीच्या दशकात ग्लॅमरस रुपात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मंदाकिनी आता खूप बदलली आहे. खासगी आयुष्यात आलेल्या चढ-उतारानंतर मंदाकिनीने फिल्मी करिअरपासून सन्यास घेतला आणि लग्न करुन संसार थाटला. ब-याच वर्षांनी मंदाकिनी दुर्गा जसराज यांची मुलगी अवनीच्या लग्नात दिसली, तेव्हा तिला ओळखणे कठीण गेले होते. आपली सेक्स सिंबॉलची इमेज तोडत 43 वर्षीय मंदाकिनी आता फार वेगळी दिसते.
राजकपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये बरीच वर्षे आपला जलवा कायम ठेवला होता.
याच काळात मंदाकिनीचे नाव दाऊदसोबत जोडले गेले होते. त्यामुळेही ती अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. मात्र दाऊद पासून वेगळे होऊन मंदाकिनीने 1995 मध्ये डॉ. कग्यूर रिनपोचेसोबत लग्न केले. सध्या मंदाकिनी मुंबईमध्ये तिबेटीयन हर्बल सेंटर चालवित आहे.
आमच्या स्पेशल मिसिंग सीरीजमध्ये आज आम्ही तुम्हाला ऐंशीच्या दशकात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री मंदाकिनीविषयी सांगणार आहोत. वरील छायाचित्रात मंदाकिनी तिचे पती डॉ. कग्यूर टी. रिनपोचे ठाकूर आणि मुलीसह दिसत आहे.
मंदाकिनीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...