(फाइल फोटोः मंडाना करीमी)
बातमी आहे, की एकता कपूरने
आपल्या आगामी सिनेमासाठी एक नवीन हीरोईन शोधून काढली असून तिचे नाव मंडाना करीमी असे आहे. मंडानाची तुलना ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल लिज हर्लेसोबत केली जात आहे. 'क्या कूल हैं हम' या सिनेमाच्या सीरीजच्या तिस-या भागात एकता मंडानाला लाँच करणार आहे. यापूर्वी मंडाना भाग जॉनी या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणार असून तिच्यासोबत कुणाल खेमू या सिनेमात झळकणार आहे.
कोण आहे मंडाना करीमी
26 वर्षीय मंडानाचे वडील भारतीय वंशाचे तर आई ईराणी आहे. तेहरानमध्ये मंडाना लहानाची मोठी झाली आहे. मंडाना ईराणी अभिनेत्री आहे. हाँगकाँगची एजन्सी मॉडेल मॅनेजमेंटमध्ये तिला दोन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. मंडानाने जेजे वाल्या, अबु जानी-संदीप खोसला, रोहित बल, आना सिंह, सत्या पॉल यांसारख्या प्रसिद्ध डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केले आहे. बॉलिवूड स्टार
शाहरुख खानसोबत रॉय स्टॅग आणि
करीना कपूरसोबत
सोनी इरिक्सन या जाहिरातींमध्येही मंडाना झळकली आहे.
मंडानाने क्वालालांपूर (मलेशिया)मधून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मंडानाला ऑगस्ट 2013च्या स्टफ इंडिया मॅगझिन आणि ऑक्टोबर 2013च्या क्रूज टुडेज या मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळाले होते. मॉडेलिंगसोबतच मंडानाने विविध क्षेत्रात काम केले आहे. शिक्षिका, सेल्स मॅनेजर, तेहरान येथे फ्लाइट अटेंडेंट म्हणून मंडानाने काम केले आहे.
लाँचिंगच्या तयारीत एकता...
असे म्हटले जाते, की एकता कपूर 'क्या कूल हैं हम' या सीरिजच्या तिस-या भागाची तयारी करत आहे. या सिनेमात मंडाना लीड अॅक्ट्रेस म्हणून झळकणार आहे. एकताने मंडालाला हिंदी भाषेचे धडे गिरवण्याचा सल्ला दिला आहे. सिनेमाचे प्री प्रॉडक्शन काम सुरु झाले आहे. या सिनेमात मंडानासोबत तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि कृष्णा अभिषेक मुख्य भूमिकेत झळकतील. जानेवारी 2015 मध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'क्या कूल हैं हम' या सिनेमाचा दुसरा भाग 'क्या सुपर कुल हैं हम' 2012मध्ये रिलीज झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मंडाना करीमीची ग्लॅमरस छायाचित्रे...