आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Malhotra\'s Niece Riddhi\'s Wedding Reception

मनीष मल्होत्राने दिले भाचीच्या लग्नाच्या निमित्ताने ग्रॅण्ड रिसेप्शन, जमली सेलेब्सची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडूनः उर्मिला मातोंडकर, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, विद्या बालन)
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी सोमवारी रात्री त्यांची भाची रिद्धीच्या लग्नाच्या निमित्ताने एक ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन केले होते. ही रिसेप्शन पार्टी मुंबईतील जे. डब्ल्यू मॅरिएटमध्ये ठेवण्यात आली होती. या ग्रॅण्‍ड रिसेप्शनला बी टाऊनमधील सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.
ईशा गुप्ता, रेखा, प्रियांका चोप्रा, पूनम ढिल्लन, रवीना टंडन, करिश्मा कपूर, करण जोहर, उर्मिला मातोंडकर, जूही चावला, सोफी चौधरी, कृती सेनन, नेहा धूपियासह अनेक सेलेब्स नवदाम्पत्याला शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री यावेळी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या.
13 डिसेंबर रोजी रिद्धीच्या संगीत सेरेमनीतसुद्धा अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. रिद्धीचे लग्न तेजस तळवलकरसोबत झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिद्धी-तेजसच्या ग्रॅण्ड रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या ग्लॅमरस सेलेब्सची खास झलक...