हिंदी सिनेमांची अभिनेत्री मनीषा कोईरालासाठी 2 मे हा आनंदाचा दिवस होता. या दिवशी तिचा बर्थ डे नव्हता, परंतु तिच्यासाठी बर्थ डे पेक्षा कमी नव्हता. या दिवशी ती कर्करोगासारख्या गंभीर आजारातून मुक्त झाली होती. 2 मे 2013 रोजी तिला कर्करोगाच्या आजारातून पूर्णत: मुक्त घोषित केले होते. म्हणून मनीषाने या दिवसाला खास बनवण्यासाठी योजना केली होती.
मनीषाने आपल्या आयुष्याच्या या खास दिवसाला जूने मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबीयांसोबत साजरे केला. तिच्या या आनंदात अभिनेत्री तब्बू, दीप्ती नवल, जॅकी श्रॉफसारखे स्टार्स सामील झाले होते. यादरम्यान मनीषा म्हणाली, की नवीन आयुष्यला सुरूवात करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षात तिने आयुष्याचे नव-नवीन रुप बघितले आहे.
मनीषाला जवळपास दोन वर्षांपूर्वी कर्करोगाच्या आजाराविषयी माहिती झाले होते. परंतु आता ती पूर्णत: तंदुरुस्त झाली आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करून मनीषाच्या नवीन आयुष्याला सुरूवात करण्याचा आनंद मनीषाच्या चेह-यावर स्पष्ट दिसून येत होता. तिने आयोजित केलेल्या पार्टीत मनीषा खूप आनंदी दिसून येत होती. ती बॉलिवूडमध्ये पुनरागमनासाठी काही सिनेमांच्या पटकथा वाचत आहे.
पुढे वाचा... टि्वटरवर केला आनंद व्यक्त...