आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीषा कोइराला करणार 'सितारे'द्वारे पुनरागमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅन्सरसारख्या आजाराचा धैर्याने सामना करणारी मनीषा कोइराला पुन्हा चित्रपटांकडे वळत आहे. 2012 मध्ये मनीषा राम गोपाल वर्माच्या 'भूत रिटर्न्‍स'मध्ये दिसली होती. मात्र, हा चित्रपट फ्लॉप ठरण्याबरोबरच राम गोपाल वर्मांचे करिअरदेखील मंदावले. तरीदेखील नव्या जोमाने तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच तिने 'सितारे' चित्रपट साइन केला आहे.
हा चित्रपट नावाप्रमाणेच बॉलिवूड सिनेतार्‍यांच्या आयुष्यावर आधारित असेल. दिग्दर्शनाची जबाबदारी कपिल शर्मा सांभाळणार असून ते 'डुनो वाय. न जाने क्यों'मध्ये अभिनय करताना दिसले होते.