आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manisha Koirala In Delhi For Inauguration Of Website

PICS: कँसरशी लढा जिंकल्यानंतर, मनिषा कोयरालाची कार्यक्रमाला उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॅन्सरबरोबर लढा जिंकल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोयराला आता पुनरागमनासाठी सज्ज आहेत. शनिवार सायंकाळी दिल्लीत एका सोहळ्यात ती सहभागी झाली होती. दिल्लीच्या हयात रिजेंसी हॉटेलमध्ये एका वेबसाईटच्या प्रमोशनसाठी ती पोहोचली होती. मनिषा कॅन्सरमुळे अनेक दिवस अशा कार्यक्रमांपासून दूर होती. 2012 मध्ये आलेला भूत रिटर्नस् हा तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती पुन्हा आता सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागली आहे. पण सध्या तिचा चित्रपटांत पुनरागमानाचा काहीही इरादा नाही.
कॅन्सरच्या उपचारासाठी मनिषा काही काळापासून अमेरिकेत होती. वेबसाईटच्या प्रमोशनसाठी पोहोचलेल्या मनिषाने यावेळी माध्यमांशीही चर्चा केली. आपण स्वतः या वेबसाईटशी संलग्न अशल्याचे तीने सांगितले. याद्वारे ती लोकांना शुभेच्छा देते तसेच काही खासगी मतेही मांडते.
फोटो - दिल्लीत वेबसाइट प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात सहभागी झालेली मनिषा.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मनिषाची काही छायाचित्रे...
सर्व फोटो - भूपिंदर सिंह