आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:\'जय जवान जय किसान\'वर मनोज यांनी सिनेमा बनवावा, अशी होती PM शास्त्रींची इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दिलीप कुमार आणि मनोज कुमार)
भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मनोज कुमार यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला. ते गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आजही त्यांची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाहीये.
मनोज कुमार यांचा आज 78 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी हरियाणातील करनाल येथे झाला होता. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे आहे. त्यांच्या जन्मावेळी करनाल पाकिस्तानात होते. फाळणीनंतर ते भारतात आले होते.
हरियाली और रास्ता, वो कौन थी, हिमालय की गोद में, दो बदन, उपकार, पत्थर के सनम, नील कमल, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, क्रांती हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
अभिनयाबरोबर मनोज कुमार यांनी देशभक्तिपर सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना 'भारत कुमार' आणि 'क्रांती कुमार' ही नावं दिली.
1992 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केले होते. देशभक्तिवर आधारित सिनेमे तयार करणा-या मनोज कुमार यांच्याकडे तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' या घोषवाक्यावर एक सिनेमा तयार करण्याचा आग्रह धरला होता.
मनोज कुमार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला त्यांच्याशी निगडीत फॅक्टसह त्यांची दुर्मिळ छायाचित्रे दाखवत आहे....