(फाइल फोटो - मान्यता आणि संजय दत्त)
पती तुरुंगात गेल्यानंतर मान्यता दत्तने संजय दत्तच्या व्यावसायिक जीवनातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सुरुवातीला संजय दत्त प्रॉडक्शनला तिने नव्या जोमाने उभे केले. संजयच्या गैरहजेरीमध्येदेखील तिच्या बॅनरच्या चित्रपटाचे शूटिंग जोमाने चालू आहे. यामध्ये
अमिताभ बच्चन अभिनीत 'हंसल पिघल गया'चा समावेश आहे. याशिवाय संजयच्या जीवनावर बायोपिक बनवण्यासाठीदेखील ती
आपल्या टीमसोबत काम करत आहे.
आता मान्यताने संजय दत्तवर एक पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या पुस्तकात मान्यताच्या आयुष्यावरील काही घटना मांडण्यात येणार आहेत. लोकांची मात्र संजयच्या आयुष्यातील घटना वाचण्याची इच्छा आहे. या पुस्तकाबाबत माहिती जमा करण्यासाठी मान्यता संजय दत्तच्या जुन्या मित्रांची भेट घेणार आहे.