आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wedding Anniversary: Manyata To Surprise Sanjay Dutt By Visiting Him In Jail!

7th Wedding Anniversary: संजयची येरवडा तुरुगांत अचानक भेट घेऊन मान्यता देणार सरप्राइज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः संजय आणि मान्यता दत्त)

सध्या येरवडा तुरुंगात कारावास भोगत असलेला अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांच्या आयुष्यातील आजचा दिवस खूपच खास आहे. कारण आज त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस आहे. 11 फेब्रुवारी 2008 रोजी पारंपरिक पद्धतीने संजय मान्यतासोबत विवाहबद्ध झाला होता.
सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यताने त्याला सरप्राईज देण्याचे ठरवले आहे. संजय सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात आहे. त्यामुळे मान्यता आज तुरुंगात जाऊन संजयची भेट घेणार आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेच तिचे संजयसाठी सरप्राईज असणार आहे.
खरं तर मान्यताला महिन्यातून एकदा संजयला भेटण्याची परवानगी आहे. त्यामुळे तिने या महिन्यातील आजची तारीख निवडली. तुरुंगात संजयला एखादी भेटवस्तू देण्याची परवानगी मान्यताला मिळालेली नाहीये. मात्र तिची अचानक घडलेली भेट हेच संजयसाठी बेस्ट गिफ्ट असणार, नाही का?