(फोटो - वरील बाजुला गिरीजा ओक तिचा मुलगा कबीरसह. खालील छायाचित्रात सोनाली कुलकर्णी आपल्या लेकीसह आणि सुबोध भावे आपल्या दोन मुलांसह दिसत आहे.)
मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली गिरीजा ओक-गोडबोल हिचा लाडका लेक 17 जुलै रोजी एक वर्षांचा झाला. कबीर हे गिरीजाच्या लाडक्या लेकाचे नाव आहे. मुलाच्या जन्मानंतर गिरीजाने काही काळासाठी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कबीरची खास झलक दाखवत आहोत. याशिवाय मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांच्या मुलामुलींचीही भेट आम्ही तुमच्याशी घडवून देत आहोत.
फार थोड्या जणांनी मराठीतील प्रसिद्ध इतर कलाकारांच्या मुलामुलींना पाहिले आहे. एखाद-दुस-या कार्यक्रमात हे मराठी कलाकार आपल्या मुलांबरोबर दिसतात. आता तर मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांची मुले चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाली आहेत. तर काहींची मुले अद्याप लहान आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांच्या नव्या पिढीला...