आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Before and After : Pixमध्ये पाहा गेल्या काही वर्षात किती बदलला तुमच्या सर्वांचा लाडका \'श्री\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अभिनेता शशांक केतकर )

'होणार सून मी ह्या घरची' या झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या मालिकेतील श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मुलगा किंवा जावई असावा तर तो श्रीसारखाच असावा, असे प्रत्येक आईला वाटतं. तर आपला भावी जोडीदारसुद्धा त्याच्यासारखाच असाच असे बहुदा प्रत्येक तरुणीला वाटत असावे. देखणा, समजूतदार, प्रेमळ असे सर्व गुण श्रीमध्ये आहेत.
15 सप्टेंबर 1985 रोजी पुण्यात जन्मलेल्या शशांकने मराठी रंगभूमीवरुन आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. खरं तर तो इंजिनिअर असून ऑस्ट्रेलियातून त्याने इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. याशिवाय तो एक राष्ट्रीय स्तरावरील स्विमरसुद्धा आहे.
स्वप्नांच्या पलिकडे, रंग माझा वेगळा, सुवासिनी, फिरुनी नवी जन्मेन मी, कालाय तस्मै: नम: या मोजक्या मालिकांमध्ये झळकला आहे. मात्र त्याला खरी ओळख प्राप्त झाली ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे. या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला. आता शशांक लवकरच व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा प्रवेश घेतोय. 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकात शशांक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय. दोन पिढ्यांमधील अंतर हा या नाटकाचा विषय आहे.
मालिकेप्रमाणेच रंगभूमीचा पडदासुद्धा गाजवण्यासाठी सज्ज झालेल्या शशांकची काही खास छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही छायाचित्रे शशांकच्या कॉलेज जीवनातील असून मागील काही वर्षांत शशांकच्या लूक्समध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येईल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पूर्वी आणि आत्ता कसा दिसतो तुमचा लाडका श्री...
(नोट - सर्व छायाचित्रे शशांकच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.)