आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Shreyas Talpade Latest News In Marathi

श्रेयस तळपदे परतणार छोट्या पडद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही आपला ठसा उमटवणारा श्रेयस तळपदे मराठी चित्रपट निर्मितीपाठोपाठ आणि छोट्या पडद्यावरही पुनरागमन करणार आहे. ई-टीव्हीवर लवकरच सुरू होणार्‍या ‘झुंज मराठमोळी’ या नव्या शोमध्ये तो प्रथमच सूत्रसंचालकाची भूमिका साकारणार आहे.

दूरदर्शनवरील गाजलेल्या ‘दामिनी’, झी वरील ‘वह’ आणि आभाळमायासारख्या मालिकांमधून सुरुवातीच्या काळातच श्रेयसने आपली छाप पाडली. पुढे इकबालद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करून त्याने अपना सपना मनी मनी, गोलमालसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. नंतर सनई-चौघडेसारख्या स्वत:चीच निर्मिती असलेल्या मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका सोडल्यास श्रेयस मराठी चित्रपटात फारसा दिसला नाही.

सध्या तो ‘पोस्टर बॉइज’ हा स्वत:चीच निर्मिती असलेल्या दुसर्‍या चित्रपटात व्यग्र आहे. अलीकडेच त्याने ‘बाजी’ या अँनिमेशन पटामध्ये मराठी सुपरहीरो साकारला. त्यानंतर आता श्रेयस ‘झुंज मराठमोळी’च्या निमित्ताने पुन्हा छोट्या पडद्यावर आगमन करतो आहे. प्रथमच तो शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्रातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन श्रेयस घडवणार आहे. तसेच तरुणांना मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी तो प्रोत्साहन देणार आहे.

त्याच्यासोबत 14 सेलिब्रिटी या रोड ट्रीपची सुरुवात करणार आहेत. हे सेलिब्रिटी महाराष्ट्राच्या 12 शहरांमध्ये टास्कच्या माध्यमातून हा मराठमोळा जागर करणार आहेत. त्यामुळे श्रेयसचे छोट्या पडद्यावरील पुनरागमन आणि महाराष्ट्र दर्शन असा दुहेरी ठेवा प्रेक्षकांना मिळणार आहे.