आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, \'लय भारी\'त रितेशची प्रेयसी असलेल्या ग्लॅमरस राधिकाविषयी बरेच काही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - राधिका आपटे)

एकाच वेळेस मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगु आणि तामिळ इंडस्ट्रीमध्ये काम करणारी अभिनेत्री राधिका आपटे आता रितेश देशमुखची प्रेयसी म्हणून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. आगामी 'लय भारी' या सिनेमात राधिका रितेश देशमुखसह स्क्रिन शेअर करणार आहे. येत्या 11 जुलै रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
खासगी आयुष्य...
राधिका मुळची पुण्याची असून 7 सप्टेंबर 1985 रोजी तिचा जन्म झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिचे अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चारु आपटे यांची ती मुलगी आहे.
बालपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या राधिकाने महाविद्यालयीन जीवनात असताना 'आसक्त' या मराठी नाट्यसंस्थेमध्ये प्रवेश घेतला. तू, पूर्णविराम, मात्र रात्र आणि कन्यादान इत्यादी मराठी नाटकांमधून तिने अभिनय केला. 2009 साली सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सिनेमाचा पुरस्कार मिळवलेल्या 'अंतहीन' या बंगाली सिनेमामध्ये तिने 'बृंदा' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.
ट्रेंड कथ्थक नृत्यांगणा आहे राधिका...
'शोर इन द सिटी' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेच वर्षभरासाठी राधिका लंडनला नृत्याचे धडे गिरवायला निघून गेली. याविषयी एका मुलाखतीत राधिकाने सांगितले होते, ''मुळात मला नृत्य प्रचंड आवडतं. मी कथ्थक शिकलेय. मला कंटेम्पररी डान्स शिकायची तीव्र इच्छा होती. एकदा काही कामानिमित्त ती संधी हुकली. पुढची संधी घालवायची नव्हती, म्हणूनच मी लंडनला राहून दीड वर्ष नृत्याचा हा प्रकार शिकले. तसंही योग्य वयात नृत्य शिकले तरच उपयोग आहे. तिथं खूप कष्ट करून मी नृत्य शिकले. रोज अक्षरश: बारा तास मी तालीम केली.''
ब्रिटीश बॉयफ्रेंडसह केले लग्न...
राधिका 2012 मध्ये तिचा ब्रिटीश बॉयफ्रेंड बेनडिक्ट टेलरसह विवाहबद्ध झाली. बेनडिक्ट लंडन बेस्ड म्युझिशिअन आहे. लंडनमध्ये नृत्याचे शिक्षण घेत असताना तिची आणि बेनडिक्टची भेट झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रुपांतर त्यांनी लग्नात केले.
राधिकाचे निवडक गाजलेले सिनेमे...
2005 - व्वा लाइफ हो तो ऐसी - हिंदी
2006 - दरमियान - हिंदी
2009 - अंतहिन - बंगाली
2009 - घो मला असला हवा - मराठी
2009 - समांतर - मराठी
2010 - रक्तचरित्र 1 - हिंदी
2010 - रक्तचरित्र 2 - हिंदी
2011 - शोर इन द सिटी - हिंदी
2012 - तुकाराम - मराठी
2013 - रुपकथा नॉय - बंगाली
2013 - ऑल इन ऑल अझेगू राजा - तामिळ
2014 - पोस्टकार्ड - मराठी
2014 - लेजेंड - तेलुगु

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा राधिका आपटची 24 ग्लॅमरस छायाचित्रे...
(फोटो साभार - फेसबुक)