आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Sonali Kulkari In Marathi Movie Zapatalela 2

‘झपाटलेला 2’मधील लावणीने मला ओळखलं जावं-सोनाली कुलकर्णी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘नटरंगने मला ओळख मिळवून दिली. मात्र, आता यापुढे मला 'झपाटलेला 2' मधील लावणीने ओळखलं जावं’, असे सांगत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘झपाटलेला 2’च्या लावणीचे कौतुक केले.

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच थ्रीडी स्वरूपात येणार्‍या ‘झपाटलेला 2’चित्रपट संगीताचा प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलेल्या लावणी नृत्याने उपस्थित भारावले. ‘नटरंग’ सिनेमाच्या गाजलेल्या लावणीनृत्याने सोनाली कुलकर्णीला लावणी नृत्यांगना म्हणून तर फुलवा खामकर हिला लावणीची उत्तम कोरिओग्राफर म्हणून नाव मिळवून दिले आहे. ‘झपाटलेला 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे कॉम्बिनेशन पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. पहिली थ्रीडी लावणी सोनाली कुलकर्णीवर चित्रित झाल्याची नोंद चित्रपटसृष्टीच्या इतिहासात राहणार आहे.

नवी ओळख मिळावी
नटरंग सिनेमातील लावणीतून यशोशिखर गाठणार्‍या सोनाली कुलकर्णीला या नव्या लावणीतून नवी ओळख प्राप्त व्हावी, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

गुरू ठाकूरची शब्दरचना
‘काळजात मुक्काम केला’ असे बोल असलेली ही लावणी, गुरू ठाकूर यांची शब्दरचना, अवधूत गुप्ते यांनी दिलेली संगीताची जोड, फुलवा खामकरची कोरिओग्राफी आणि पडद्यावर सोनाली कुलकर्णीसारखी नृत्यांगना अशी जमून आलेली पहिलीवहिली थ्रीडी लावणी लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी संगीतकार अवधूत गुप्ते, दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘झपाटलेला 2’ हा चित्रपट 7 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.