आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या दिग्दर्शकांना संधी देणार राकेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन नव्या दिग्दर्शकांना संधी देण्यासाठी पुढे आले आहेत. सध्या इंडस्ट्रीतील सगळे मोठे निर्माते-दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन हाऊस नव्या दिग्दर्शकांची मदत करत आहेत. ज्याप्रमाणे करण जोहर ‘द लंच बॉक्स’सारख्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पुढे आला. चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश बत्राचे कोणतेच बॉलिवूड कनेक्शन नव्हते शिवाय त्यांना पूर्वीचा अनुभवदेखील नव्हता. असेच काही आनंद गांधीच्या ‘शिप ऑफ थिसीयस’सोबत झाले. त्यांनादेखील किरण नाव आणि यूटीव्हीचे सर्मथन मिळाले. याबरोबरच ‘बीए पास’चा दिग्दर्शक अजय बहल यांना नवा चित्रपट मिळवून देण्यात महेश भट्ट यांनी पुढाकार घेतला.

आता राकेश रोशन यांनीदेखील या मोहिमेत भाग घेतला आहे. ते म्हणाले की, ‘चांगल्या दिग्दर्शकाला मदत करण्याबाबत मी उत्सुक आहे. एखादा चांगला चित्रपट जो पैशाअभावी प्रदर्शित होऊ शकला नसेल तर मी मदत करायला तयार आहे. नव्या प्रतिभेला संधी देण्यासाठी मोठय़ा प्रॉडक्शन्सलादेखील पुढे यायला हवे.’