मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू
विराट कोहली यांच्या अफेअरची चर्चा आज सगळीकडे रंगत आहे. मात्र अनुष्कासह आणखी एक अभिनेत्री विराटसाठी क्रेझी असल्याची नवीन बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही अभिनेत्री आहे मराठमोठी तेजस्विनी पंडीत. मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये झळकलेल्या तेजस्विनीने विराटविषयीचे
आपले प्रेम जाहीर केले आहे. विराटपासून आपण प्रेरणा घेत असल्याचे तिने म्हटले आहे.
27 वर्षीय तेजस्विनीने तिचे पती भूषण बोपचे यांचे एक छायाचित्र
ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात भूषणने विराट कोहलीसारखी हेअरस्टाईल ठेवली आहे. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटवर तेजस्विनीने आपल्या पतीचे हे छायाचित्र पोस्ट करुन आपण विराटपासून प्रभावित असल्याचे म्हटले आहे. शिवाय तिने विराटचा उल्लेख 'स्वीट' म्हणून केला आहे. तेजस्विनीने यापूर्वीही विराटची प्रशंसा केली आहे.
तेजस्विनी सध्या '7 रोशन व्हिला' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय ती 'एक तारा' या आगामी सिनेमातही झळकणार आहे.