आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUN MOOD : मराठी तारकांची लंडन आणि इस्‍तंबूलवारी, बघा खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमृता खानविलकर, पूजा सावंत, भार्गवी चिरमुले, मनीषा केळकर, सिया पाटील या मराठी फिल्म इंडस्ट्रीतील तारका अलीकडेच लंडन आणि इस्तंबुलवारी करुन परतल्या आहेत. या सर्व अभिनेत्रींनी लंडनमध्ये 'मराठी तारका' हा कार्यक्रम सादर केला.

बाराहून अधिक तारकांचा अनोखा नृत्याविष्कार सादर करणारा ‘मराठी तारका’ हा कार्यक्रम पहिल्यांदाच सातासमुद्रापार लंडनमध्ये 10 ऑगस्ट रोजी पार पडला.

लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम वेम्बली येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर सर्व तारकांना येथील प्रसिद्ध ‘लायन किंग’ हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळली. तसेच लंडनहून येताना इस्तंबूल येथेही या सर्व तारकांनी भेट दिली. या सर्व जणींनी लंडन आणि इस्तंबूल येथे मजामस्ती केली. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकरची आई गौरी खानविलकरसुद्धा तिच्याबरोबर होती.

आज आम्ही तुम्हाला या तारकांची परदेशवारीची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये या सर्व जणी धमाल करताना दिसत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा मराठी तारकांची धमाल...