(श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करताना मराठी कलाकार)
पुणे : मराठी सिने नाट्यसृष्टीतील तब्बल 71 मराठी कलावंतांनी सोमवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला विश्वशांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले. सलाम पुणे या संस्थेने या उपक्रमाद्वारे पुण्याच्या गणेशोत्सवात एक ऐतिहासिक क्षण नोंदविला. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया'चा एकच जयघोष कलावंतांनी केला.
या महाआरतीत अभिनेता पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, पुष्कर जोग, सचिन खेडेकर, विनीत शर्मा, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, कांचन अधिकारी, दक्षिणेची प्रसिध्द अभिनेत्री डिम्पल चोपडे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, ज्योती चांदेकर, जयमाला काळे, सुहासिनी देशपांडे, गौरी गाडगीळ, संग्राम साळवीस, भूषण कडू , देवेंद्र भगत, सचिन गवळी, जॉनी रावत, पूजा पवार, प्रीतम कांगणे, हीना पांचाळ, प्रतीक्षा जाधव, वृंदा बाळ, गौरी कोंगे, मोहिनी कुलकर्णी, मिथीला नाईक, सोनिया बर्वे, निखिल वैरागर, अश्विनी दरेकर, विजय कोंडके, मेघराज राजे भोसले, निर्माते निलेश नवलाखा, विशाल गवारे, मोहन दामले, माछिंद्र धुमाळ, अजय नाईक, निखिल महामुनी, हर्षित अभिराज, आशिष केसकर, सुनील वाईकर, अमोल कांगणे, सुनील महाजन, निकिता मोघे, संतोष चोरडिया, मयुर लोणकर, सुवदन आंग्रे, कुमार डोंगरे, दीपक सवाखंडे, योगेश वनवे, हेमंत वनारसे, वैभव पगारे, संग्राम सरदेशमुख, प्रियांका यादव, गौतमी देवस्थळी, कौस्तुभ कुलकर्णी, दत्तात्रय हिंगणे, प्रदीप लडकत, नितीन जाधव, योगेश जोरे यांच्यासह एकुण 71 कलावंत सहभागी झाले होते.
सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर, निलेश तरवाडे, महेश आणि मंगेश सूर्यवंशी, रवि सहाने यांनी कलावंतांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा महाआरतीच्या वेळी क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...