आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : वीणा, कश्यप, श्रुती यांच्याकडे कसा साजरा होतो पाडवा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुढीपाडव्याचा सण घरांघरांत आनंद-उत्साह घेऊन येतो. विजयाचे प्रतिक असलेली गुढी उभारली जाते, आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांची तोरणे दाराची शोभा वाढवतात. नववर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होत पाडव्याचा सण उत्साहात, आनंदात साजरा होतो. याच निमित्ताने अलीकडेच रिलीज झालेल्या 'तप्तपदी' या सिनेमातील मुख्य कलाकार म्हणजेच अभिनेत्री वीणा जामकर, श्रुती मराठे आणि अभिनेता कश्यप परुळेकर गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करतात हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
काय म्हणतात हे तिघे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत....