आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Cinema Than Than Paal Muhurta By Akshay Kumar

‘खिलाडी’ला करायचंय मराठीत काम, ‘72 मैल’ नंतर दुसरा सिनेमाही तयार करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनेक अमराठी व्यक्ती मराठी चित्रपट निर्मितीत उतरत असून अक्षयकुमारनेही आपल्या बॅनरअंतर्गत काही दिवसांपूर्वी ‘72 मैल’ हा चित्रपट तयार केला होता. त्यामुळे अक्षयकुमारला आता मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली आहे. ‘ठण ठण गोपाळ’ चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी त्याने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सिद्धांत महेश शेट्टी आणि निधी प्रकाश शेट्टी ओम गणेश प्रॉडक्शन्स बॅनरअंतर्गत आपला पहिला मराठी ‘ठण ठण गोपाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अक्षयकुमारच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अक्षयकुमारने मराठीत भाषण केले. तसेच मराठी भाषेवर प्रेम असल्यानेच आपण मराठी चित्रपटाची निर्मिती करत असून लवकरच आपण दुसरा मराठी चित्रपट तयार करणार असल्याचे सांगितले.
अक्षयकुमार आणि अश्विन यार्दी यांनी ‘72 मैल’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला तरी समीक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली. अक्षय म्हणाला, मराठी चित्रपट दर्जेदार असून वेगळे विषय हाताळत असतो. एखाद्या चांगल्या भूमिकेची ऑफर मिळाली तर मला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. ‘ठण ठण गोपाळ’ चित्रपटाचा दिग्दर्शक कार्तिक शेट्टी हा अक्षयकुमारचा बालपणीचा मित्र असून दोघे एकाच शाळेत शिकलेले आहेत. या मैत्रीखातरच अक्षयकुमार मुहूर्त क्लॅप देण्यासाठी आल्याचे शेट्टीने सांगितले. मराठी चित्रपट निर्मितीत बॉलीवूड कलाकार यापूर्वीही उतरले असून अमिताभ बच्चन यांनी ‘विहीर’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. अक्षयने ‘72 मैल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. एकता कपूर, शिल्पा शिरोडकर, अश्विनी भावे यांनीही मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.
मिलिंद गुणाजीची भूमिका
राहुल अंबादास पोटे व श्रीनिवास प्रदीप शिंदे या चित्रपटाचे सहनिर्माते असून या चित्रपटात मिलिंद गवळी, सुझेन बर्नाड, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका असून बाबू बेंड बाजाप्रसिद्ध राष्ट्रीय पारितोषिक विजेता बाल कलाकार विवेक चाबुकस्वारची मध्यवर्ती भूमिका आहे.