आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘झी मराठी’वर ‘नक्षत्र’ कार्यक्रमात दर्जेदार नाटक 'आसू आणि हसू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसंत कानेटकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून झी मराठी नक्षत्र सादर करीत आहे, मराठी रंगभूमीवरील दर्जेदार नाट्यकृती 'आसू आणि हसू '.
वसंत कानेटकर यांच्या संकल्पनेतल हे नाटक त्यांच्या हयातीत लिहून पूर्ण होऊ शकले नाही. पण या संकल्पनेच्या ध्यासाने पेटलेल्या मोहन वाघांनी हे नाटक रंगभूमीवर आणण्याची धुरा सांभाळली. लेखनाचं शिवधनुष्य उचललं ते प्र. ल. मयेकर यांनी. त्यांच्या अथक प्रयत्नांनी मराठी रंगभूमीवर साकारलं वसंत कानेटकर यांच्या संकल्पनेतल एक दर्जेदार नाटक 'आसू आणि हसू' प्र. ल. मयेकर लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित या नाटकात मोहन जोशी, रीमा लागू, विद्याधर जोशी, ऋग्वेदी म्हात्रे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. अशोक पत्की यांच्या बहारदार संगीताला देवकी पंडित यांनी आपल्या आवाजाने साज चढवला आहे .
कथासार :
डॉं. हेमंत (मोहन जोशी ) आणि त्यांची पत्नी वर्षा (रीमा लागू) यांची ही कथा. वर्षा ही संशयी असून ती आपल्या नवऱ्यावर कायम त्यांचे विवाहबाह्य संबंध एका विद्यार्थिनीशी असल्याचा संशय घेते. रोजच्या वादावादीला कंटाळून पहिल्या प्रवेशाअंती हे जोडपे विलग होते
दुसरा प्रयोग सुरु होतो तो हीच कथा हीच पात्र आणि हीच नावे घेऊन, फक्त बदल होतो तो वर्षाच्या प्रवृतीत. तिचं क्षणाक्षणाला चिडणं कमी होत, ती शांत होते, हेमंतच्या बाहेरख्याली वृतीकडे दुर्लक्ष करू लागते. हेमंतला मात्र तिच्या या स्वभावाचा राग येऊ लागतो. आता या आगळ्या परिस्थितीत या जोडप्याच नेमकं काय होणार? हे या नाटकात पाहणे नक्कीच औत्सुक्याचे आहे.
पती-पत्नीच्या या नात्यातला हा आगळा- वेगळा प्रवास पहायला विसरू नका, रविवार 22 जून रोजी दुपारी एकवाजता आणि सायंकाळी सात वाजता ‘झी मराठी’वरील ‘नक्षत्र’ कार्यक्रमात.