आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तर-ऐंशी स्क्रिप्टमध्ये लाभतो एखादाच चांगला सिनेमा - अशोक सराफ यांची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते अशोक सराफ यांना सिनेसृष्टीत मामा म्हणतात. पत्रकारसुद्धा त्याला अपवाद नाहीत. मामा आता हल्ली फारसे भेटत नाही तुम्ही? हा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, 'घरी माझ्या सत्तर ऐंशी स्क्रिप्ट गुंडाळून ठेवल्या आहेत, त्यातला कुठलाही चित्रपट केला तरी प्रेक्षक म्हणतील, का हो केलात हा चित्रपट? मला कथा-पटकथा -संवाद आवडल्या शिवाय काम करावेसे वाटत नाही. अशा सत्तर ऐंशी स्क्रिप्ट नंतर एखादी स्क्रिप्ट चांगली वाटली की, मी लगेच हो म्हणतो.
अभिनेते अशोक सराफ 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. खरे तर मला माझ्या चित्रपटांबद्दल स्वतःहून बोलायला आवडत नाही. त्यामुळे प्रश्न विचार मी उत्तर देतो असे म्हणणाऱ्या मामांना पहिलाच प्रश्न असा आला. ते म्हणाले हा चित्रपट खरोखर एक हलकीफुलकी कॉमेडी आहे यात आठ पात्रे आहेत. अर्थात ही वेडी नाहीत पण टिपिकल स्वभावाची हेकेखोर माणसे असतात अशी ही पात्रे आहेत. या सिनेमातून पुण्याला टार्गेट केले किंवा पुणेरी वृत्तीला टार्गेट केले असे काही म्हणता येणार नाही, पण अशा स्वभावाची माणसे बहुधा ठिकठिकाणी असतात.

अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती संथेचा हा तिसरा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी या संस्थेने 'तेंडूलकर आऊट' आणि 'सुखांत' हे चित्रपट केलेत. आंधळी कोशिंबीरमध्ये अशोक सराफ, वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, प्रिया बापट, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, हृषिकेश जोशी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आनंद इंगळे यांचे बंधू आदित्य इंगळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे
जन्मतःच अतिशय भांडकुदळ स्वभावाचे असलेले बापू सदावर्ते (अशोक सराफ) बायको देवाघरी गेल्यानंतर पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या आपल्या प्रशस्त बंगल्यात त्यांचा मुलगा रंगा (अनिकेत विश्वासराव) सोबत राहतात. सोबत असूनही दोघेही एकएकटेच रहातात. बापू भूतकाळ रंगविणारे तर रंगा काहीही न करता भविष्यातील भव्य स्वप्नात रंगणारा … रंगा आणि त्याचा मित्र वश्या या दोघांनी अनेक उद्योगधंदे सुरु करण्याचे प्रयत्नही केलेत. पण त्यासाठी स्थानिक गुंड गोरक्ष (हृषिकेश जोशी) याच्याकडून घेतलेले भांडवल त्यांच्या रोजच्या गरजच भागवायला उपयोगी पडले आहे. दुसरीकडे अभिनेत्री व्हायचे स्वप्न पाहणारी मंजू (प्रिया बापट) नावाची बहिण गोराक्षाला आहे. दुष्यंत (आनंद इंगळे) हा कवी मनाचा वकील आहे. त्याचे कमाईचे अन्य उद्योगसुद्धआ आहेत. त्याचे त्याची भाडेकरू असलेली शांती चिटणीस (वंदना गुप्ते) हिच्यावर अगदी महाविद्यालयीन जीवनापासून ते आता तो पन्नाशीपर्यंत पोहोचला, तरीही नितांत प्रेम आहे.
अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची गुंफण या सिनेमात करण्यात आली आहे. येत्या 30 मे रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'आंधळी कोशिंबीर' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत क्लिक झालेली सेलिब्रिटींची खास झलक...