'प्यार किया नाही जाता, हो जाता है' असं म्हणतात. नकळत कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात घरं करू लागतं, त्याच्या किंवा तिच्या विचारांनी मनं घेरून जातं मग कुठे ध्यानात येतं, की आपण प्रेमात पडलोय. पण अशा या प्रेमात अनेक ट्विस्ट येतात, कधी हे प्रेम अव्यक्तच राहतं, तर कधी तिसऱ्याच्या एण्ट्रीने प्रेमाचा त्रिकोण तरी होतो. प्रेमाची अशीच एक आगळीवेगळी कहाणी असलेला पारस मुव्हीज प्रस्तुत 'असा हा अतरंगी' हा मराठी चित्रपट 28 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
प्रेमकथेला विनोदाची साथ असलेल्या 'असा हा अतरंगी' मध्ये प्रेक्षकांना असाच अनुभव अनुभवायला मिळणार आहे. प्यारेलाल चौधरी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलंय. चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे जगन्नाथच्या मध्यवर्ती भूमिकेत असून प्रियांका यादव नायिकेच्या भूमिकेत आहे.
काय आहे चित्रपटाची स्टोरी लाइन, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...