आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते सयाजी शिंदेंचा ‘चॅलेंज’ तेलगूत येणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेते सयाजी शिंदे यांची दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रियता लक्षात घेता त्यांचा नवा मराठी सिनेमा‘चॅलेंज’ तेलगू भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तेलगूत डब होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षात मराठी सिनेमा एक प्रकारे सीमोल्लंघनच करत आहे. दीपक गोडे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

गोडे यांनी सांगितले की, सयाजी शिंदे यांना दक्षिण भारतात प्रचंड लोकप्रियता आहे. ‘चॅलेंज’मध्ये ते खलनायकाचे पात्र साकारत आहेत. सिनेमाचे एकूण बजेट साडेतीन कोटी रुपये असून यात अनेक दर्जेदार सीन्स चित्रित करण्यात आले आहेत. मलेशिया व दुबई येथेही सिनेमाच्या गाण्यांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मराठीतील हाय बजेट असलेला हा सिनेमा असणार आहे. सिनेमाचे कथानक युनिव्हर्सल असल्याने तो दक्षिण भारतातही यशस्वी होईल याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन नव्या चेहर्‍यांना संधी
‘चॅलेंज’मध्ये पीयूष रानडे व कांचनमाला भोरने हे नवे चेहरे आहेत. सयाजीच्या प्रेमिकेच्या भूमिकेत दक्षिणेतील मराठी नायिका धनश्री दिसणार आहे. जुलै महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.