आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : पाहा इस्टमन कलर 'दुनियादारी'ची पहिली झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या कादंबरीवर आधारित मराठी सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाची पहिली झलक अलीकडेच रिलीज करण्यात आली आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे इस्टमन कलरमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.
अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, उदय टिकेकर, उदय सबनीस, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर आणि वर्षा उसगांवकर ही तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून चिन्मय मांडलेकर या सिनेमासाठी पटकथा आणि संवादलेखन केल आहे. अजित-समीर या जोडीने या सिनेमासाठी संगीत केले आहे. जितेंद्र जोशीने या सिनेमासाठी गीतलेखन केले आहे.
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा मल्टिस्टारर 'दुनियादारी'ची ही पहिली झलक...