Home »Marathi Katta» Marathi Film Duniyadari Song Recording

PHOTOS : इस्टमन कलर 'दुनियादारी'ची टीम इलेव्हन

दिव्य मराठी वेब टीम | Feb 23, 2013, 11:52 AM IST

संजय जाधव दिग्दर्शित इस्टमन कलर लव्हस्टोरी असलेल्या 'दुनियादारी' सिनेमाचा फर्स्ट लूक अलीकडेच रिलीज करण्यात आला. या सिनेमाचा फर्स्ट लूक सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर बराच गाजतोय. या सिनेमात 70-80च्या दशकातील काळ उभा करण्याय आला आहे. या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे शीर्षक गीत मराठी चित्रपटसृष्टीतल्या आघाडीच्या अकरा कलाकारांनी गायले आहे.
जिंदगी... जिंदगी... जिंदगी हा जिंदगी...
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी...
हे बोल असलेणारे शीर्षक गीत सचिन पिळगांवकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळे, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी या अकरा दमदार अभिनेत्यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे.
'से' बॅण्डच्या यो उर्फ सचिन पाठक यांनी हे गीत लिहिले असून 'से' बॅण्डनेच या गीताला संगीतबद्ध केले आहे.
हिंदी आणि मराठी शब्दांचा सुंदर मिलाप या गाण्यात साधला आहे.
विशेष म्हणजे कोणतेही मानधन न घेता या कलाकारांनी हे गाणे आपल्या आवाजात स्वरबद्ध केले आहे.
सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी' या लोकप्रिय कादंबरीवर आधारित या सिनेमात स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, उर्मिला कानेटकर, सई ताम्हणकर, रुचा हसबनीस यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

'दुनियादारी'च्या साँग रेकॉर्डिंगची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended