आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गुरु पौर्णिमा एक Lovable गोष्ट'चे थाटात म्युझिक लाँच, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(म्युझिक लाँच सोहळ्यातील छायाचित्र)
मुंबई - प्रेम जगातील सगळ्यात सुंदर भावना. ती शब्दांत व्यक्त करणं अवघडच. प्रेम हे प्रेम असतं ते कोणी आणि कोणावर केलं यावत ते चूक की बरोबर हे ठरवता येत नाही. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर आपण प्रेमात पडतोच. प्रेम कधी रिमझिम बरसणार तर कधी आवेगाने झेपावणार... अगदी पावसासारखं. प्रेमाची हीच गमंत मेघना मनोज काकुलो निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित 'गुरु पौर्णिमा' सिनेमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणा-या 'गुरु पौर्णिमा' सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे, सचिन पिळगावकर, निर्माते नानूभाई जयसिंघानी आणि सिनेमातील स्टारकास्ट हजर होती.
उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर स्टारर या सिनेमातील गाण्यांना अविनाश-विश्वजीत या संगीतकार द्वयीने संगीत दिले आहे. तर बेला शेंडे, स्वप्नील बांडोदकर, स्वरुप भालवणकर, संदीप उबाळे, नेहा राजपाल, श्रावणी रविंद्र यांच्या सुरेल आवाजात ही गाणी स्वरबद्ध केली आहेत.
उपेंद्र लिमये आणि सई ताम्हणकर यांच्यासह हिंदीतील ज्येष्ठ अभिनएत्री सुलभा आर्य, सुशांत नायक, राजीव हेडे, विधीता काळे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा म्युझिक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे...