आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SUNDAY SPL: कोण आहे मराठीतील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री, तुम्हीच सांगा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील कोणतीही अभिनेत्री सध्या कुठेही मागे राहू इच्छित नाही. त्यामुळे जवळपास सर्वंच अभिनेत्रींमध्ये सर्वंच बाबतीत टोकाची स्पर्धा दिसून येते. एकमेकींना मागे टाकण्याच्या स्पर्धेत सर्वंच अभिनेत्रींनी अंग प्रदर्शनाचा जणू धडाकाच लावला आहे. यात काही अभिनत्री आघाडीवर असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटात बिकिनी अवतारात दिसलेली सई ताम्हणकर असो, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हॉट अंदाजात दिसलेली नेहा पेंडसे असो किंवा इंटरनेटवर बोल्ड फोटो अपलोड झालेली श्रुती मराठे असो. कोणत्या न कोणत्या प्रकारे मराठी अभिनेत्री प्रकाशझोतात येत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत कोणती अभिनेत्री सर्वांत बोल्ड आणि हॉट आहे, असा प्रश्न चित्रपटप्रेमींना पडला आहे.

मराठीत पहिल्यांदाच एका चित्रपटात बिकीनी घालून हॉट सीन देणा-या सईची चांगलीच चर्चा झाली होती. त्यापूर्वी एका वेगळ्याच कारणाने ती चर्चेत आली होती. परंतु, तिने तेव्हा त्यात माझा कोणताही दोष नाही असा खुलासा केला होता. त्यानंतर ते प्रकरण मिटले होते. परंतु, अजूनही सईची बिकीनीतील छायाचित्रे आवर्जून बघितली जातात. त्यांना मराठी आणि हिंदी संकेतस्थळांवर पेजव्हुही जास्त मिळतात.

झी मराठी वाहिनीवरील 'राधा ही बावरी' या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या श्रुती मराठेची काही बोल्ड छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिने पोलिसात तक्रारदेखील दाखल केली आहे. परंतु, या प्रकरणी चर्चा झाली ती श्रुतीच्या बोल्ड अंदाजाची.

नेहा पेंडसेने बरयाच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिलेले बोल्ड फोटोशुट अजूनही चविने बघितले जातात. त्यांनाही संकेतस्थळांवर उत्कृष्ठ पेजव्हुज मिळतात.

या अभिनेत्रींसह इतर काही मराठी अभिनेत्रींनी बोल्ड अंदाजात फोटोशुट केलेले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या नवीन अभिनेत्री यात आघाडीवर आहेत. त्यामुळे कोणती अभिनेत्री सर्वांत बोल्ड आणि हॉट आहे, ही चर्चा कधीही न संपणारी असल्याचे दिसून येते. शेवटी प्रत्येक व्यक्तीची चॉईस ही वेगळीच असणार, होय ना!

बोल्ड अवतारातील मराठी अभिनेत्रींचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..