आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जिल्ह्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या शनिवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. तर संत तुकोबांचा पालखी सोहळा रविवारी जिल्ह्यात प्रवेश करत आहे. या पालख्यांच्या स्वागतासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील बरड येथील शेवटचा मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वरांची पालखी शनिवार जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे सकाळी 8.30 वाजता येणार आहे. या ठिकाणी पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आमदार हनुमंत डोळस, सभापती राजलक्ष्मी माने पाटील हे पालखीचे स्वागत करतील.

पालखीच्या या जिल्हा प्रवेशाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली. स्वागतानंतर हा पालखी सोहळा नातेपुते येथे मुक्कामासाठी विसावणार आहे. नातेपुते येथेही पालखी मुक्कामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस यांनी आज पालखी मार्गाची व मुक्काम ठिकाणांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सराटी येथील मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी 8 वाजता सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश करणार आहे.

पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार डोळस यांच्यसह आमदार विजयसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर सकाळी दहा वाजता पालखीचे स्वागत करतील. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे.