आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Kaksparsha Remake In Hindi And Tamil

‘काकस्पर्श’चा हिंदी आणि तामिळमध्ये रिमेक येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा बहुचर्चित ‘काकस्पर्श’ चित्रपट लवकरच हिंदी आणि तामिळ भाषेतही झळकणार आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ‘रोजा’ फेम अभिनेता अरविंद स्वामी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री टिस्का शर्मा यात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘काकस्पर्श’मध्ये दर्जेदार भूमिका करणारी अभिनेत्री केतकी माटेगावकर तामिळ आणि हिंदी रिमेकमध्ये पहिल्यांदाच गायन करणार आहे. दोन्ही भाषांतील रिमेकमध्ये ती गाणी गाणार आहे. ‘काकस्पर्श’मध्ये सचिन खेडेकर यांनी हरिदादा दामले ही मुख्य भूमिका साकारली होती. तामिळ आणि हिंदीमध्ये ती अरविंद स्वामी साकारणार असल्याची माहिती आहे. अरविंद स्वामी आणि सचिन खेडेकर यांच्यात बरेच साम्य असल्याने महेश मांजरेकरांनी त्याला रिमेकसाठी निवडल्याचे समजते. रिमेकमध्ये प्रिया बापटला स्थान देण्यात येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री टिस्का शर्मा हरिदादा दामले यांच्या पत्नीच्या रूपात दिसेल.
चित्रीकरण कोकणातच
‘काकस्पर्श’चे संपूर्ण चित्रीकरण कोकणातील गुहागर भागात झाले होते. एका विधवा स्त्रीची होणारी घुसमट आणि कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या जबाबदारीचे यथार्थ चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपटाचे कथानक मराठी संस्कृतीशी निगडित असल्याने हिंदी आणि तामिळ रिमेकचे चित्रीकरणही याच भागात करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी 16 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आदिनाथ कोठारे प्रथमच हिंदीत
‘झपाटलेला-2’मधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हिंदी ‘काकस्पर्श’ मधून पडद्यावर पदार्पण करणार आहे. तो विधवा उमाचा नवरा महादेवची भूमिका साकारणार्‍या अभिजित केळकरची जागा घेणार आहे. मिलिंद गुणाजीसुद्धा रिमेकमध्ये दिसतील.