आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Film Por Bazaar First Look & Poster Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: मनवाच्या ‘पोर बाजार’चा FIRST LOOK लाँच, सईसह पोहोचले अनेक स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शकांची एक नवी पिढी समोर येत असून परदेशातून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतलेले काही दिग्दर्शक मराठीमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यात आणखी एका दिग्दर्शकाची भर पडणार असून मराठी रंगभूमी आणि सिनेमांमधून सतत आपल्या भेटीस येणारी अभिनेत्री मनवा नाईक आता दिग्दर्शनाच्या वाटेवर आली आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’, 'एआरडी एन्टरटेन्मेंट’ आणि ‘स्ट्रॉबेरी पिक्चर्स’ प्रस्तुत ‘पोर बाजार’ या सिनेमाचे दिग्दर्शन अभिनेत्री मनवा नाईक हिने केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. अलीकडेच मुंबईत मनवाच्या या सिनेमाचा फस्ट लूक लाँच सोहळा संपन्न झाला. या सोहळ्या मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावून मनवाला शुभेच्छा दिल्या.
रंगभूमी आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची दमदार छाप पाडल्यानंतर आता अभिनेत्री मनवा नाईक सिनेमा दिग्दर्शनाच्या नव्या इनिंगला सुरूवात करीत आहे. याआधी काही नाटकांसाठी मनवाने प्रॉडक्शन संदर्भात कामे केली असून तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मधून फिल्ममेकिंगचे रितसर शिक्षण पूर्ण केले आहे. मोठ्या पडद्यावरील आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचे प्रत्यक्ष मनोरंजन केल्यानंतर आता मनवा पडद्यामागून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
‘पोर बाजार’ हा एक धमाल सिनेमा असून यात मराठीतील तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. ‘पोर बाजार’ ही कथा पाच तरूणांची... अजय, मंजिरी, समर, विशाल आणि रागिणी अशी त्यांची नावे... कॉलेजमध्ये शिकणारी ही तरुण गॅंग नेहमीच लेक्चर बंक करून धमाल मस्ती करत असतात. अचानक असेच एकदा लेक्चर बंक करून ते एका घरात शिरतात आणि सुरू होतो एक अ‍ॅडव्हेंचर प्रवास...या धमाल कथानकात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर या दमदार जोडी सोबतच चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, प्राजक्ता दिघे, कमलाकर नाडकर्णी, शंतनु गव्हाणे, विकास पाटील, अनुराग वोरलीकर, स्वारंगी मराठे, सत्या मांजरेकर, सखील परचुरे, धर्मज जोशी आणि मृणाल पंतवैद्य यांच्याही महत्वाच्या भूमिका बघायला मिळणार आहे.
सत्या मांजरेकर हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा असून सखील परचुरे ही अतुल आणि सोनिया परचुरे यांची मुलगी आहे. तर धर्मज जोशी हा मराठी व हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांचा मुलगा आहे.
धमाल स्टारकास्ट आणि धमाल कथानक असलेल्या ‘पोर बाजार’ ची पटकथा आणि संवाद पराग कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. तर गुरू ठाकूर, श्रीरंग गोडबोले आणि मंदार चोलकर यांनी लिहिलेल्या गीतांना शैलेंद्र बर्वे यांनी संगीत दिले आहे. धनंजय कुलकर्णी यांनी छायाचित्रण तर अपुर्वा आणि आशिष यांनी संकलन केले आहे. या सिनेमाच्या टायटल साँगसाठी प्रसिद्ध सिनेमटोग्राफर महेश लिमये यांनी छायाचित्रण केले आहे. कोरिओग्राफी उमेश जाधव, सोनिया परचुरे यांची असून मनाली जगताप हिने कॉस्च्युम डिझाईन केलेत. सुमीत पाटील यांनी कला दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पोर बाजार'चा फस्ट लूक आणि सोहळ्याची खास छायाचित्रे...