आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ-गिरीजाच्या 'प्रियतमा' सिनेमाचे थाटात म्यझिक लाँच, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनाला साद घालणारे सूर... मनाचा ठाव घेणारा ताल जर एकत्रित जुळून आला तर निर्माण झालेलं संगीत हे नेहमीत अप्रतिम असतं. प्रेमाला अशाच रेशमी भावबंधनात गुंफणारं संगीत घेऊन 'प्रियतमा' हा प्रेमपट व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा अलीकडेच मुंबईत पार पडला. या म्युझिक लाँच सोहळ्याला सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती.
सतिश मोतलिंग दिग्दर्शित या सिनेमात वेगवेगळ्या प्रकारची एकुण पाच गाणी असून चैतन्य अडकर यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. 'तुह्या रुपाचं चांदणं' हे पारंपरिक प्रेमगीत अभय इनामदार, प्रकार होळकर यांनी लिहिलं असून प्रसन्नजीत कोसंबी आणि आनंदी जोशी यांनी ते गायलं आहे. अभय इमानदार लिखित 'घुंगराच्या तालावरी' या गीताला बेला शेंडे आणि उत्कर्ष शिंदे यांनी स्वरबद्ध केले आहे. याशिवाय देवाची विनवणी करणारी यातील दोन गाणी प्रकाश होळकर यांनी लिहिली आहेत. यातील 'उदो उदो आईचा' हे गीत आनंद शिंदे यांनी गायले असून 'दार उघड' हे गीत आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केले आहे. या चार गीतांसह अभय इनामदार यांच्याच लेखणीतून साकारलेले 'लागीर लागीर' या गीताला आदर्श शिंदे यांचा स्वरसाज चढला आहे.
प्रेमातील उत्कटता रेखाटणा-या या सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि गिरीजा जोशी ही जोडी प्रेक्षकांना नक्कीच प्रेमात पाडायला भाग पाडेल. सिद्धार्थ आणि गिरीजासह संजय खापरे, प्रफुल्ल सामंत, चारुशीला वाच्छानी, सागर सातपुते, रिमा म्हाजगुट, भक्ती जाधव, जय ठाणेकर, मानसी मराठे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. फुलवा खामकर यांनी या सिनेमाची कोरिओग्राफी केली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा प्रियतमा या सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्याची ही खास छायाचित्रे...