आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Promotion In Gudi Padwa Shobhayatra

पाडव्याच्या स्वागत यात्रेत सिनेमा प्रमोशनचा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबापुरीत जल्लोषात सुरू झालेल्या स्वागत यात्रेत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आगामी ‘एकुलती एक’ या सिनेमाचे मुलगी श्रियासोबत प्रमोशन करून मराठीजनांशी संवाद साधला.

येत्या महिन्यात प्रदर्शित होणार्‍या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शक आणि स्टार मंडळींनी पाडव्याच्या उपनगरातील वेगवेगळ्या मिरवणुकीत हजर राहून अनेकांशी थेट संवाद साधला. सचिन मुलगी श्रियाला घेऊन ‘एकुलती एक’ हा सिनेमा करत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सिनेमासाठी स्वागत यात्रेची निवड करून प्रमोशन केले. या वेळी सचिन म्हणाले, गिरगाव हे माझे आजोळ आहे. त्यामुळे येथे सिनेमाच्या प्रसिद्धीची गुढी उभारताना प्रचंड आनंद होत आहे. आमचा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी श्रियानेही गिरगावात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.