आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'संहिता - The Script' येत्या 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल 20 पुरस्कारांवर नाव कोरलेला आणि सहा विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झालेला चाकोरी बाहेरचे विषय हाताळणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. 'अशोक मूव्हीज प्रा. लि.' यांच्या सहकार्याने निर्माण झालेल्या या चित्रपटाची निर्मिती सुभाष घई यांच्या 'मुक्ता आर्टस लि.' ने केली असून, प्रस्तूती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या 'विचित्र निर्मिती' या संस्थेची आहे.
साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चित्रपटाच्या सर्वोत्तम संगीतासाठी असलेला पुरस्कार शैलेंद्र बर्वे यांना तर सर्वोत्तम पार्श्वगायनासाठी असलेला पुरस्कार आरती अंकलीकर यांनी गायिलेल्या 'पलके ना मोडो… ' या गीतासाठी मिळाला असून हे दोनही पुरस्कार सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'संहिता - The Script' या चित्रपटासाठी मिळाले आहेत.
या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...