आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सॅटर्डे संडे\'च्या प्रीमिअरला अवतरला आमिर खान, मराठीत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - डावीकडून, आमिर खान, मकरंद देशपांडे, अश्विनी भावे आणि सिद्धार्थ जाधव)
मकरंद देशपांडे दिग्दर्शित आणि अभिनीत सॅटर्डे संडे या मराठी सिनेमाचा प्रीमिअर सोहळा बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअर सोहळ्याचे आकर्षणबिंदू होता बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान. खास आमिरच्या उपस्थितीत सिनेमाचा प्रीमिअर मोठ्या थाटात पार पडला. आमिरने सिनेमातील सर्व कलाकारांची भेट घेतली आणि त्यांना सिनेमासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमिरने मराठी सिनेमात काम करण्याची इच्छासुद्धा व्यक्त केली. चांगली स्क्रिप्ट मिळाल्यास नक्की मराठी सिनेमात काम करेल, असे तो यावेळी म्हणाला.
या प्रीमिअरला सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. याशिवाय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अश्विनी भावे, रवी जाधव यांचीही उपस्थिती यावेळी होती.
काय आहे सिनेमाची वनलाईन...
सोमवारचा दिवस पहायचा असेल तर आपआपसातील दुश्मनी बाजूला ठेवून शनिवार - रविवार एकत्र जमण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पीए कडून निरोप येतो. त्यानंतर घडणाऱ्या रणधुमाळीत नक्की काय घडतं? याची खिळवून ठेवणारी कथा म्हणजे.. 'सॅटर्डे सण्डे' हा सिनेमा आहे..
बॉलिवूड अभिनेता मुरली शर्मा यांची एनकाउंटर स्पेशालिस्टची भूमिका या सिनेमात आहे. मकरंद देशपांडे, नागेश भोसले, नेहा जोशी, अमृता सुभाष, अमृता संत, असीम हट्टंगडी, संदेश उपशम, उमेश जगताप, मुझामिल कुरेशी, इम्रान शेख, विक्रम दहिया, नचिकेत जोशी, शैलेश हेजमाडी, श्रेयस पंडीत, अजय मोर्या या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गुन्हेगारी जगताचा वेध घेणारा 'सॅटर्डे सण्डे' 8 ऑगस्टला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा प्रीमिअर सोहळ्याला क्लिक करण्यात आलेली सेलेब्सची ही खास छायाचित्रे...