आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी मिळाली 100 चित्रपटगृहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नसल्याची ओरड होत असतानाच आता 100 पेक्षा अधिक चित्रपटगृहे मिळवून ‘लेक लाडकी’ आणि ‘येडा’ चित्रपटांच्या निर्मात्यांनी एक नवीन पायंडा सुरू केला आहे. विशेष म्हणजे येडा चित्रपटाच्या जाहिरातीत या चित्रपटाबरोबर अन्य मराठी चित्रपट प्रदर्शित करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.


इंद्रराज फिल्म्सच्या ‘लेक लाडकी’ चित्रपटाचे दिग्दर्शन यशवंत भालेकर करत असून या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यश संपादन केलेली अभिनेत्री सुप्रिया कर्णिक प्रथमच मराठी चित्रपटात पाऊल टाकत आहे. या चित्रपटात सुप्रिया प्रतीक्षा लोणकरच्या मुलीची भूमिका साकारत आहे. उमेश कामत, मिलिंद गुणाजी, प्रियंका यादव व मोहन जोशीही मुख्य भूमिकांमध्ये चित्रपटात आहेत.