आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'an Ageless Romedy\' असलेला \'कॅपेचिनो\' 25 एप्रिलला होणार रिलीज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक नवनवीन विषयांवर सिनेमा तयार होत असल्याचे पहायला मिळत आहेत. असाच एक वेगळा विषय असलेला सिनेमा एस. डी. मोशन पिक्चर्सचे संतोष देशपांडे आपल्या समोर घेऊन येत आहेत. या सिनेमाचे नाव आहे 'कॅपेचिनो'. लाईफ इज लाईक 'कॅपेचिनो' याभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे. कॉफी बनविण्यासाठी ज्याप्रमाणे दूध, साखर, पाणी, कॉफी या गोष्टींचे योग्य प्रमाण जसे गरजेचे असते त्याचप्रमाणे आपले आयुष्य सुद्धा सुख, दुख, राग, नैराश्य अशा अनेक भावनांनी भरलेले असते. एकंदरीतच लाईफ इज लाईक 'कॅपेचिनो' भोवती या सिनेमाचे कथानक गुंफण्यात असून कॉमेडी आणि तितकाच रोमॅंटिक असा हा सिनेमा आहे.
मुळचे नागपूरचे असलेल्या संतोष देशपांडे यांनी सिनेनिर्मितीत टाकलेले हे पहिले पाऊल असून आगामी 'कॅपेचिनो' या सिनेमाची निर्मिती केली आहे. नुकताच संतोष देशपांडे यांना यंदाचा 'सलाम पुणे 2014' चा उल्लेखनीय निर्मिती पुरस्कार 'कॅपेचिनो' सिनेमासाठी जाहीर झाला आहे.
'कॅपेचिनो' या सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...