आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धमक’ चित्रपटाचे रिमिक्सिंग लंडनमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. देश-विदेशात मराठीचा डंका वाजत असतानाच आता दिग्दर्शक राजेंद्र बांदिवडेकर यांनी त्यांच्या आगामी ‘धमक’ या चित्रपटाच्या गाण्याचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग लंडनमध्ये करण्याचे ठरवले आहे.
सध्या मराठी चित्रपटांच्या गाण्यासह संपूर्ण चित्रीकरण परदेशात होत आहे. यात आता ‘धमक’ या चित्रपटाची भर पडली आहे. यातील एक गाणे मेघना नायडू आणि मुमैत खान यांच्यावर चित्रित करण्यात येणार आहे. सीएस फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एकूण सहा गाणी असून सर्व गाण्यांचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग लंडनमधील ग्लोब रेकॉर्डिग स्टुडिओत करण्यात येणार आहे. गाण्याच्या चित्रीकरणासाठी 15 दिवसांचा अवधी लागणार आहे. रसिकांना वेगळेपणा वाटावा यासाठी आज कालबाह्य होत असलेल्या रावण हत्ता या वाद्यासह चेलो, बेवला, ट्रम्बॉन, ट्रम्पेड, सेक्सोफोन यासारख्या वाद्यांची अचूक सांगड गाण्यात घालण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक अँड लाइव्ह इन्स्ट्रुमेंटचा योग्य पद्धतीने वापर करून संगीतकार निर्मलकुमार यांनी मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत. लंडनमध्ये गीतांचे रिमिक्सिंग आणि मास्टरिंग पूर्ण झाल्यानंतर डॉल्बीची प्रक्रिया मुंबईत करणार असल्याचे बांदिवडेकर यांनी सांगितले. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन त्यांना जे हवे ते दिले तर त्यांची पावले आपोआपच मराठी चित्रपटांकडे आकर्षित होतील. केवळ याच कारणामुळे धमकबाबत आम्ही वेगळा प्रयोग केला असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेशचे नृत्य दिग्दर्शन
‘धमक’ चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव करणार आहेत, तर यात अनिकेत विश्वासराव आणि गिरिजा जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्यासोबत मोहन जोशी, अशोक समर्थ, विजू खोटे, विद्याधर जोशी, उमा सरदेशमुख, जयवंत वाडकर, धनंजय मांद्रेकर, अजय पाध्ये, अरविंद धनू, चेतन खरात, प्रदीप पळते यांच्याही भूमिका आहेत.