आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movie Investment To Be Screened In New York Film Festival

रत्नाकर मतकरींची ‘इन्व्हेस्टमेंट’ न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ज्येष्ठ लेखक व नाटककार रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘इन्व्हेस्टमेंट’ या चित्रपटाची अमेरिकेत होणार्‍या 13व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे.

भौतिक सुखांच्या आहारी जात नैतिक अध:पतन झालेल्या तरुण जोडप्याची आशयघन कथा आपल्या खास दिग्दर्शन शैलीतून साकारलेल्या या चित्रपटाची महोत्सवात निवड झाल्याने मराठी चित्रपटक्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संजय मोने, संदीप पाठक, प्रहर्ष नाईक आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाबरोबर गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’ हा मराठी चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन फिरोज अब्बास खान यांच्या ‘देख तमाशा देख’ या हिंदी चित्रपटाने होणार आहे. याचबरोबर नितीन कक्कर यांचा ‘फिल्मीस्तान’, हंसल मेहतांचा ‘शाहिद’, अमित गुप्तांचा ‘जादू’ असे विविध चित्रपटांचा या महोत्सवामध्ये समावेश आहे. एकूण 22 फीचर फिल्म या महोत्सवात दाखवण्यात येणार असून 3 क्लासिक, 14 नरेटिव्ह फिल्म्स आणि 5 माहितीपटांचा यात समावेश आहे.

आनंद वाटतोय
राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच न्यूयॉर्कच्या फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची निवड झाल्याबद्धल अत्यंत आनंद होतोय. मला ज्या तर्‍हेचा चित्रपट मला करायचा होता तसा मला तो करता आल्याचा आनंद होताच, शिवाय तो इतक्या चांगल्या पद्धतीने वाखाणला गेला याचेही विशेष समाधान आहे. फिल्मीपण टाळून, कमीत कमी संवाद वापरुन हा चित्रपट करण्याचा माझा प्रयत्न होता, त्याची पोच अशा संधीने मला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया मतकरी यांनी दिली.