आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi News About \'salam\' Movies First Look Launch

PICS: \'सलाम\'चा फस्ट लूक लाँच, नाना पाटेकर, सई ताम्हणकरची हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनातील अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी मानवी मुल्यांची शिदोरी जवळ असणे गरजेचे असते. सत्य, निर्भयता, खरी मैत्री, जवळच्या व्यक्तींवर असलेला विश्वास यांसारख्या अनेक गोष्टी माणुसकी जपणा-या मुल्यांमुळे जगणे सहज सुंदर करून जातात. याच संकल्पनेवर भाष्य करत साकारात्मकतेने आणि खरेपणाने जगण्याचा संदेश देणारा 'सलाम' हा मराठी सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
समीक्षकांसमवेत प्रेक्षकांच्याही पसंतीस पडलेला 'ता-यांचे बेट' या आपल्या पहिल्याच सिनेमाव्दारे मराठी सिनेमासृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत हे 'सलाम' सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. नुकताच या सिनेमाचा फस्ट लूक लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमासृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून सिनेमाला शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यामध्ये सिनेमाचे निर्माते डॉ. गौरव सोमाणी, आनंद सोमाणी, कॅलिक्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील सोमाणी, अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता उमेश कामत, जेष्ठ सुत्रसंचालक सुधीर गाडगीळ या स्टार्सच्या उपस्थितीत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते 'सलाम' सिनेमाचा फस्ट लूक लाँच करण्यात आला.
सुंदर निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात वसलेल्या एका गावातील अतरंगी माणसे, त्यांचे दैनंदिनी जीवनमान, आजूबाजूला घडणा-या धमाल घटना आणि त्यांचे निरागस आयुष्य यांवर सुंदर पध्दतीने भाष्य या सिनेमात दिग्दर्शक किरण यज्ञोपवती यांनी केले आहे.
विनोदाची चुरचुरीत फोडणी लाभलेल्या कथानकावर बेतलेल्या या सिनेमामध्ये गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, आतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे आदी कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. सोबतच, सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार मिळवणारा विवेक चाबूकस्वार या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत आहे.
'कॅलिक्स मीडिया अँड एन्टटेनमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड' प्रस्तुत 'सलाम' या सिनेमाची पटकथा आणि संवादही किरण यज्ञोपवीत यांनीच लिहिले आहेत. सिनेमाचे दृश्य कॅमे-यात कैद करण्याचे काम छायांकनकार अभिजीत अब्दे यांनी केले आहे.
सिनेमाची गाणी आघाडीचे गीतकार वैभव जोशी यांनी लिहिली असून संगीतकार राहूल रानडे यांनी स्वरबध्द केली आहेत. कलादिग्दर्शक प्रशांत बिडकर यांनी केले असून संकलन सुचित्रा साठे यांचे आहे. संजय डावरा या सिनेमाचे कार्यकारी निर्माता आहेत. अश्विनी तेरणीकर आणि विनोद सातव यांनी कार्यकारी निर्माणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा या सिनेमाविषयी नाना पाटेकर आणि इतर स्टार्स काय म्हणाले...