आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 'एकच सोंगड्या' सोहळ्यातून दादा कोंडके यांना आदरांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेमासाठी दादा कोंडके यांनी दिलेले योगदान हे अमूल्य आहे. बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या दादा कोंडके यांना महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे. त्यांच्यावरील याच प्रेमापोटी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पीपल्स आर्ट्स सेंटर मुंबई आणि वन्स म्यूझिक ग्रुपच्या वतीने 'एकच सोंगड्या' हा संगीतमय सोहळा षण्मुखानंद सभागृहात रंगला होता.
दादा कोंडके यांचा सहवास लाभलेले आणि त्यांच्या सोबत काम केलेल्या अनेक दिग्गज मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यास आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, अभिनेता शक्ती कपूर, गायक अनुप जलोटा, संगीतकार राम-लक्ष्मण, रामदास फुटाणे, उत्तरा केळकर, विजू खोटे, जयश्री टी, बाळ मोहिते, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे, श्रीकांत धोंडगे, तंत्रज्ञ यशवंत भालकर, मंगेश मंगेशकर, रंमेश गंगणे आदी मान्यवरांची यात समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी सांगितलेल्या आविस्मरणीय आठवणींमुळे दादांच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू या निमित्ताने उलगडले गेले.
दादांच्या सिनेमांवर आधारित शाम पेठकर लिखित 'दादागिरी- एक आठवण साठवण' या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दादांच्या सिनेमातील अजरामर गीतांचा नजराणा सारेगमप विजेती उर्मिला धनगर आणि वन्स म्युझिक ग्रुपने सादर करत कार्यक्रमात चांगलीच बहार आणली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुष्कर श्रोत्री आणि मेघना एरंडे यांनी केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या सोहळ्याची काही खास छायाचित्रे...