आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक सीमेवर मराठा बटालियनसाठी मराठी तारकांचा बहारदार कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
''मराठी तारका'' या मराठी गाणी, नृत्य, प्रहसने यावर आधारित लोकप्रिय कार्यक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. आता या कार्यक्रमाचे विशेष सादरीकरण भारताच्या सीमेवर असलेल्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनसाठी केले जाणार आहे. दिल्लीपासून लंडनपर्यंत कार्यक्रम सादर करणाऱ्या मराठी तारका बारामुल्ला आणि उरी येथे 15 ऑक्‍टोबर रोजी "मराठी तारका' हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता सीमेवरही मराठीचा गजर ऐकायला मिळणार आहे.
15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान बारामुल्ला परिसरात होणा-या या कार्यक्रमात मराठी लावण्या, लोकप्रिय मराठी गाण्यांचे सादरीकर, याबरोबरीने गाण्यांच्या भेंड्या, प्रासंगिक प्रहसने यांचा अंतर्भाव करुन सीमेवरच्या मराठा बटालियनचे मनोरंजन केले जाणाक आहे.
महेश टिळेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील तारकांचा "मराठी तारका' हा कार्यक्रम तयार केला आहे. आतापर्यंत त्याचे जवळपास 75 प्रयोग झाले आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दोन वर्षांपूर्वी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर लंडन येथेही हा कार्यक्रम झाला. आता तो जवानांच्या मनोरंजनासाठी बारामुल्लामध्ये होणार आहे.