आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख, ऐशपासून ते शिल्पा, गौरवपर्यंत, पाहा स्टार्सची लग्नाची छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- गौरव कपूर-किरल भट्टल, राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी)
मुंबईः फिल्म इंडस्ट्रीतील लग्नाचा मौसम पुन्हा एकदा सुरु झाल आहे. 3 नोव्हेंबर रोजी अभिनेता पुलकित सम्राट गर्लफ्रेंड श्वेता रोहिरासोबत लग्नाच्या बेडीत अडकला. त्यांच्या लग्नात सलमान खान आणि अरबाज खान यांची मुख्य उपस्थिती होती. सलमानने श्वेताचे कन्यादानसुद्धा केले.
यापूर्वी म्हणजे 2 नोव्हेंबरला टीव्ही अभिनेता गौरव कपूरसुद्धा लग्नगाठीत अडकला. गर्लफ्रेंड किरल भट्टलसोबत गौरवने लग्न केले. चंदीगड येथे दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नात बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियासह अनेक स्टार्स सहभागी झाले होते.
याचवर्षी अनेक टीव्ही आणि फिल्म स्टार्स बोहल्यावर चढले आहेत. यामध्ये राणी मुखर्जी, आफताब शिवदासानी, अहना देओल, दीपिका सिंह यांच्या समावेश आहे. या सर्वांच्या लग्नाविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला केवळ यावर्षी लग्नगाठीत अडकणा-या नव्हे तर अनेक चर्चित सेलेब्सच्या लग्नाची छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलिब्रिटींच्या आयुष्यातील या खास क्षणाची छायाचित्रे...