आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी मालिका, चित्रपटांत ‘मॅरेज सीझन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील छोट्या व मोठ्या पडद्यावरील तरुण कलाकारांना सध्या लग्नाचे वेध लागल्याचे दिसत आहे. झी मराठीवर 14 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ ही मालिका व मोठ्या पडद्यावर स्वप्निल जोशी व मुक्ता बर्वे यांची लव्ह केमिस्ट्री असलेला ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकूणच मराठी मालिका व चित्रपटांत सध्या ‘लग्नाचे वारे’ वाहताना दिसत आहेत.


झी मराठीवर अतिशय प्रभावी ठरलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेने तरुणाईचे विवाहाबाबतचे मत एकदम बदलून टाकले होते. मालिकेतील सुपरहिट जोडी राधा आणि घना म्हणजेच मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी आता ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटांत पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्याचबरोबर झी मराठीवर सुरू होत असलेल्या ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेचे प्रोमोज झळकू लागले आहेत. या मालिकेत स्पृहा जोशी आणि उमेश कामत यांची जोडी प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढवत आहे, तर याच वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री व जान्हवी लग्नाच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचले आहेत.
या मालिका ‘लग्न’ या संकल्पनेभोवती फिरत आहेत. तसेच प्रेक्षकांनाही मालिकांना उदंड प्रतिसाद दिला आहे.