आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mars Mission: B Town Says ‘Massive Achievement’

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मंगळ मिशन': बिग बी म्हणाले, 'भारत माता की जय', अक्षयने म्हटले 'ग्रेट न्यूज'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन यांचे ट्विट)
मुंबईः इंडियन स्‍पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोसाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. इस्रोने पाठवलेले यान सुमारे 65 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
भारताला मिळालेल्या या यशामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा आनंद आणि जल्लोष व्यक्त केला आहे. सोशल साइट्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त करणारे ट्विट केले आहेत.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, मधुर भंडारकर, अभिषेक कपूर, शाहिद कपूर, रितेश देशमुख, निखिल चिनप्पा, कुणाल कोहली, सोफी चौधरी, वीर दास, रणवीर शोरी आणि मोहित चौहानसह अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी सोशल नेटवर्किंग साइट टिवटरवर ट्विट केले, "मंगळयान... भारत माता की जय! ऐतिहासिक! हॉलिवूड सिनेमांपेक्षाही कमी बजेटमध्ये एकमेव देशाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले आहे."
दुस-या ट्विटमध्ये बिग बींनी लिहिले, ''आपल्या शास्त्रज्ञांनी ते शक्य करुन दाखवले, जे इतर कुणालाही जमू शकले नाही... शुभेच्छा, प्रेम, स्नेह, अभिनंदन आणि जय जयकार!! MOM!!''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉलिवूडच्या इतर सेलेब्सचे ट्विट...