आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजपूर्वीच महाराष्ट्रात TAX FREE झाला प्रियांकाचा \'मेरी कोम\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मेरी कोम सिनेमाचे पोस्टर)

बॉक्सर मेरी कोमच्या जीवनावर आधारित आणि प्रियांका चोप्रा अभिनीत 'मेरी कोम' हा सिनेमा रिलीज होण्यास अद्याप एक आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्रात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अर्थातच महाराष्ट्रात मेरी कोमला पाहण्यासाठी लोकांना कमी पैशात तिकिट मिळू शकतील.
'मेरी कोम' हा सिनेमा टॅक्स फ्री होण्याची माहिती स्वत: सिनेमाची मुख्य अभिनेत्री प्रियांका चोप्राने टि्वटरवर दिली आहे. प्रियांकाने टि्वट केले, 'मेरी कोम रिलीजच्या एक आठवडापूर्वीच महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाल्याची घोषणा झाली आहे.' तर सिनेमाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनीही 5 सप्टेंबर अर्थातच शिक्षण दिनाच्या दिवशी रिलीज होणारा हा सिनेमा टॅक्स फ्री झाल्याचे स्पष्ट केले आहे.
अलीकडेच, रिलीज झालेला राणी मुखर्जीचा 'मर्दानी'सुध्दा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात टॅक्स फ्री झाला आहे. पण 'मर्दानी' हा रिलीज झाल्यानंतर आणि 'मेरी कोम' रिलीजपूर्वीच टॅक्स फ्री झाला, हे विशेष.